Maharashtra weather update :
राज्यात पावसाचा जोर आता कमी झाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात कोकणसहविदर्भातील काही जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातही काही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरातील अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आणि ते आज त्याच ठिकाणी स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर कोकणासह गोव्यात पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
१८ तारखेपासून कोकण गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १९ तारखेपासून मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये मात्र १६ सप्टेंबरपासूनच काही ठिकाणी आणि १८ व १९ तारखेपासून बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यामध्ये पुढील दोन तीन ते चार दिवस हलक्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व विदर्भात पुढील चार ते पाच दिवस रोज काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भात या जिल्ह्यांना ''यलो अलर्ट''
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी हल्का ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना सुरक्षित जागी ठेवावे.
* उडीद व मुग या पिकांची काढणी करून कोरड्या व सुरक्षित जागी ठेवावे.