Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात तापमानात मोठी घट झाली आहे. येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या उपसागरात आज (२३ नोव्हेंबर) रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानात होणार असून २६ नोव्हेंबरपासून पुढे तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे दक्षिण भारतातील काही राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात येत्या काही दिवसात किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पहाटेच्या वेळी धुके पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात गारठा वाढला आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंडी वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात घट झाली आहे. प्रामुख्याने विदर्भ, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम माराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमान कमी झाले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी.
* फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.