Join us

Maharashtra Weather Update : राज्यात संमिश्र वातावरण; 'या' भागात यलो अलर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 09:34 IST

Maharashtra Weather Update: फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. त्यात मागील आठवड्यात हवामानात बदल झाला असून मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात आता रात्री आणि पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत आहे. (Mixed weather)

Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. त्यात मागील आठवड्यात हवामानात बदल झाला असून मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागात आता रात्री आणि पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत आहे. (Mixed weather)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात ऋतुबदलामुळे तापमानात वाढ होत आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि पाणी पिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना हवामान विभागाने केली आहे. (Mixed weather)

'या' जिल्ह्यात उष्णतेचा इशारा

गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकर हैराण झाले असताना रविवारपासून मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अवघ्या १५ दिवसांत दुसऱ्यांदा उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाल्याने आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

मराठवाडा, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री आणि पहाटेच्या वेळी चांगलीच थंडी जाणवत आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी उष्णतेचा अलर्ट दिला आहे तर काही ठिकाणी थंडी जाणवत आहे. सध्या राज्यात संमिश्र हवामान पाहायला मिळत आहे. (Mixed weather)

शेतकऱ्यांना सल्ला

* फळबागेचे व्‍यवस्‍थापन करताना जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे.

* नविन लागवड केलेल्या संत्रा/मोसंबी रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' जिल्ह्यात असेल कोरडे हवामान; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडा