Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : ऑक्टोबरमधील पावसाळा रविवारपर्यंत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : ऑक्टोबरमधील पावसाळा रविवारपर्यंत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : Monsoon in October rain warning till Sunday | Maharashtra Weather Update : ऑक्टोबरमधील पावसाळा रविवारपर्यंत पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update : ऑक्टोबरमधील पावसाळा रविवारपर्यंत पावसाचा इशारा

ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पावसाचे दुसरे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी आठ दिवस आधीच सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पावसाचे दुसरे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी आठ दिवस आधीच सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारीही जिल्ह्यात एकूण ९.९ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, रविवारपर्यंत कोल्हापुरात विजांच्या कडकडाटासह पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी ऑक्टोबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील पावसाचे दुसरे आवर्तन नियोजित वेळेपूर्वी आठ दिवस आधीच सुरू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

पावसाचे दुसरे आवर्तन
दुसरे आवर्तन नियोजित तारखेऐवजी सहा दिवस अगोदर म्हणजे दि.१६ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सुरू झाले आहे. प्रत्यक्षात दि. २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोल्हापूर विशेषतः सातारा आणि सांगलीतही जोरदार पावसाची शक्यता आहे.

ईशान्य मान्सूनचे आगमन
दरम्यान, हा परतीचा पाऊस नसून याचे रूपांतर दि. १५ ऑक्टोबरपासूनच नैऋत्य मान्सून म्हणजे ईशान्य मान्सूनमध्ये झाल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. तीन महिन्यांत चार राज्यांत नैऋत्य मान्सूनोत्तर हिवाळी पाऊस म्हणजेच ईशान्य मान्सूनचे आगमन होत असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Maharashtra Weather Update : Monsoon in October rain warning till Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.