नवी दिल्ली : देशभरात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाल्यानंतर तो आज, सोमवारपासून परतीच्या मार्गावर निघणार आहे. याची सुरुवात पश्चिम राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातून होणार आहे.
परतीच्या मान्सूनमुळे दक्षिण आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे मान्सूनच्या पुनरागमनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
महाराष्ट्रात काय?■ दुष्काळाचा कायमचा पाहुणा असलेल्या राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा ५८ टक्के जास्त पाऊस झाला.■ देशात सरासरी ८२.७२ सेंटीमीटर पावसाच्या तुलनेत यंदा ८८.२० सेंटीमीटर पाऊस आला आहे. मध्य प्रदेशात सामान्यपेक्षा १५% जास्त आणि छत्तीसगडमध्ये ६% जास्त पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात २२ टक्के अधिक पाऊस आला आहे.
लवकर आला, सहा दिवस उशिराने जाणारयावेळी केरळ आणि ईशान्य भारतात ३० मे रोजी मान्सूनचे एकाच वेळी आगमन झाले, जे आगमनाच्या सामान्य तारखेच्या दोन दिवस आधी होते, मान्सून माघारीची सामान्य तारीख १७ सप्टेंबर असली, तरी तो सहा दिवस उशिरा परतीकडे निघणार आहे. २ जुलै रोजी मान्सूनने संपूर्ण देश व्यापला.
या राज्यांत पाऊस कमी■ आतापर्यंत मान्सून हंगामात, मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस आला आहे, उत्तर-पश्चिम भागात सामान्य पाऊस झाला आहे आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस झाला आहे.■ बिहार, पंजाब, नागालैंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, अम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.■ बिहारमध्ये कमी पाऊस झाला असला तरीही गंगा नदी सध्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
शेतकऱ्यांमध्ये आनंदी आनंदयंदा खरिपाच्या पेरणी क्षेत्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गतवर्षी खरीप हंगामात १०७२.९४ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, तर यंदा १०९६.६५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापूस आणि ताग वगळता तांदूळ, कडधान्ये, तेलबिया आणि भरड धान्य यांसारख्या इतर सर्व पिकांचे क्षेत्र वाढले आहे. ९४% धरणे महाराष्ट्रातील भरली आहेत. त्यामुळे यंदाचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.