Join us

Maharashtra Weather Update : मान्सूनची मुसंडी पुढील चार दिवसात राज्यात या ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:09 AM

सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला.

पुणे : सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला.

तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही जोरदार पाऊस होत आहे. रायगड जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.

उर्वरित तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाने विश्रांती घेतली पण अर्धा महिना संपल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढला.

दरम्यान, वायव्य झारखंड आणि परिसरावर ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्याकडे येण्याची शक्यता आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सोमवारी नव्याने कमी दाब क्षेत्राचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज आहे.

मान्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेरपासून, कोटा, खजुराहो, व कमी दाबाचे केंद्र, रांची ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. गुजरातपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

घाटमाथ्यावर मुसळधार■ कोकणातील रायगडसह पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे. तर पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.■ उर्वरित कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुढील २ दिवसांचा अलर्ट रेड अलर्ट : रायगड, पुणे, साताराऑरेंज अलर्ट: पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, नाशिकयलो अलर्ट : मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला

राज्यात २९ ऑगस्टपर्यंत पावसाचे दिवस आहेत. पुढील दोन दिवस तर काही भागात रेड अलर्ट जारी केला आहे. घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होईल. संपूर्ण महाराष्ट्रात काही भागात मुसळधार, मध्यम ते हलक्या सरी कोसळतील. - डॉ. अनुपम कश्यपी, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमहाराष्ट्रकोकणविदर्भमराठवाडासातारापुणे