Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

Maharashtra Weather Update: Rain will be active again in the state from today, where and what alert | Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे.

आज १ ऑगस्टला रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

१ ते ४ ऑगस्ट या चार दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो.

आतापर्यंत ओढ दिलेल्या प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. ५ ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो.

कुठे कधी कुठला अलर्ट
■ २ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
■ ३ ऑगस्ट : ऑरेंज - नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा
■ ४ ऑगस्ट : ऑरेंज - रायगड

Web Title: Maharashtra Weather Update: Rain will be active again in the state from today, where and what alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.