Join us

Maharashtra Weather Update: पुढील तीन दिवस राज्यात या जिल्ह्यांत पडणार असा पाऊस.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 11:19 AM

राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही चांगला पाऊस पडेल.

राज्यात आणि पुण्यातही पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पाऊस राज्यातही ठिकठिकाणी पडत आहे. पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या इतर भागांतही चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. रविवारपासून (दि. १४) बुधवारपर्यंत (दि. १७) महाराष्ट्रात मध्यम ते जोरदारपावसाची शक्यता वाढली आहे.

समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीवर आहे. त्यामुळे राज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. घाटमाथ्यावर मुसळधारचा इशारा देण्यात आला असून, इतर ठिकाणी मध्यम ते हलक्या सरी कोसळतील.

कोकणातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. तसेच सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील काही भागात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा या जिल्ह्यांना रविवारी रेड अलर्ट असून रायगड, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे. मराठवाडा, खान्देश आणि विदर्भातील काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे.

शनिवारी आणि रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही जिल्ह्यांत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मान्सून बळकटनंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जोरदार पाऊस कोसळण्यास बळकटपणे 'ऑफ शोर ट्रफ उभा आहे. उत्तर गुजरात व बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. वर्षाछायेच्या वरील जिल्ह्यात १४ ते १७ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खान्देश, नाशिक जिल्ह्यात तर आठवडाभर २० जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता कायम आहे, असे माणिकराव खुळे यांनी सांगितले.

पावसाच्या अपेक्षित समान वितरणाला धक्का पोहोचून पावसाळी दिवस कमी होत आहेत. पावसाचे आकडे दिसतात, पण शेतपिकांसाठी पाऊस नाही, ही ओरड झाली आहे आणि हीच गेल्या महिनाभरातील महाराष्ट्रातील मान्सूनच्या पावसाची शोकांतिका आहे. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाज