Maharashtra Weather Update: मुंबईसह मराठवाडा, (Marathwada) कोकणात उष्णतेत वाढ झाली होती. मात्र, आता विदर्भात (Vidarbha) गडगडाटीसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
येत्या पाच दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडेल आणि तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज(२० मार्च) रोजी तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये दुपारनंतर ढगाळ हवामान राहील. अवकाळी पावसामुळे हवामानात थंडावा येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे.
'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता
राज्यात धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.
* काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.