Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट  

Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट  

Maharashtra Weather Update : Read the IMD report on the possibility of rain in "this" district of the state   | Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट  

Maharashtra Weather Update :  राज्यात "या" जिल्ह्यात पावसाची शक्यता वाचा IMD रिपोर्ट  

राज्यात येत्या ४८ तासांत कसे असेल हवामान काय दिला हवामान विभागाने इशारा वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

राज्यात येत्या ४८ तासांत कसे असेल हवामान काय दिला हवामान विभागाने इशारा वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : 

पश्चिम बंगालमधून उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ‘यागी’ वादळाचा परिणाम आता उत्तर प्रदेशच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा IMD ने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी, शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असेही हवामान विभागाने कळविले आहे.

राज्यातील काही भागांत गेल्या चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (१८ सप्टेंबर) रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

याशिवाय, येत्या २१ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. गणपती विसर्जनानंतर राज्यातील काही भागांत पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली. राज्यात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यातील बहुंताश भागांत पावसाच्या सरी कोसळतील. 

काही ठिकाणी पावसाची शक्यता 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, नांदेड, लातूर, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर, पुणे आणि बीड येथे पावसाची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांना सल्ला?

* मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी उडीद आणि मुग पिके काढणीसाठी आले आहे. ते काढून एका सुरक्षित जागी ठेवावे. 

* मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपले पशुधन सुरक्षित जागी ठेवावे जेणे करून पावसाची फटका त्यांना बसणार नाही याची दक्षता घ्यावी.
 

Read in English

Web Title: Maharashtra Weather Update : Read the IMD report on the possibility of rain in "this" district of the state  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.