Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: Record temperature recorded in Solapur; What is today's weather forecast? Read in detail | Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद; काय आहे आजाचा हवामान अंदाज वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. वाचा हवामान अंदाज सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. वाचा हवामान अंदाज सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत (Temperature) असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  शुक्रवारी सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापुरचा पारा ४१ .१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. तसेच कोकणातही सातत्यातने तापमानात बदल होत आहे.

IMD ने  दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानामध्ये सातत्याने बदल होताना दिसतोय. काही ठिकाणी उष्णता तर काही ठिकाणी थंड वातावरण बघायला मिळत आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तापमानात सातत्याने वाढ देखील होताना दिसतेय. (Temperature)

तळकोकणात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. दमट वातावरणाचा फटका आंबा, काजू, जांभूळ या पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोलापुरात पुन्हा एकदा तापमानाने उच्चांक गाठला. शुक्रवारी पारा ४१ .१ अंश सेल्सिअसवर पोहोचला. (Temperature)

१५ मार्चपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिले चक्रीवादळ इराकमधून उत्तर भारताकडे सरकत आहे, ज्यामुळे दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या भागात वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बांगलादेशातून दुसरे चक्रीवादळ येत आहे. त्यामुळे पूर्व आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळांमुळे उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. (Temperature)

राज्यातील वातावरणात सातत्याने बदल

सध्या राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा चटका जाणवत आहे तर कुठे सध्या ढगाळ वातावरण होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. (Temperature)

शेतकऱ्यांना सल्ला

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सिअस पुढे गेला आहे. त्यामुळे पिकांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

Web Title: Maharashtra Weather Update: Record temperature recorded in Solapur; What is today's weather forecast? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.