Join us

Maharashtra Weather Update: चार दिवस मुसळधार राज्यात या जिल्ह्यांत रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 11:08 AM

हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे.

पुणे : हवामान विभागाने पुढील ४ दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अनेक भागांत जोरदार पाऊस होत आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.

पुढील चार दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, पुणे जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांना अलर्टरेड अलर्ट: पुणे, सातारा घाट माथा. ऑरेंज अलर्ट : विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात आहे.ऑरेंज अलर्ट: विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही भागात ऑरेंज अलर्ट आहे.यलो अलर्ट: कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

अधिक वाचा: Ujani Dam Water Level: दहा दिवसात उजनी भरले शंभर टक्के धरणाचे सोळा दरवाजे उघडले

टॅग्स :हवामानपाऊसमहाराष्ट्रविदर्भकोकण