Maharashtra Weather Forecast : राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून कोकण (Konkan) आणि इतर भागातही पाऊस आणि उष्णतेचा तडाखा दिसून येत आहे. विदर्भ, मराठवाडा, मुंबई आणि कोकणात पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. (Temperatures rise)
दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील आठवड्यापासून तापमानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे अवकाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Temperatures rise)
राज्यात काही ठिकाणी पारा वाढताना दिसतोय. उन्हाच्या झळा या अधिक तीव्र झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण झाले. (Temperatures rise)
मात्र, आता अवकाळीचे ढग दूर गेले असून उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी तर पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे बघायला मिळत आहे. विदर्भ (Vidarbha), मराठवाडा, मुंबई आणि कोकणात पारा वाढताना दिसतोय.
मागील काही दिवसांपासून कोकणात उकाडा आणि उष्णता चांगलीच वाढली होती. आता कोकणात अवकाळी पावसाच्या सरी बरसतील. यामुळे वातावरणात काहीसा गारवा बघायला मिळेल. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुलपिकास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणे करून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.