Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : Signs of good rain this October How and how much rain will fall? Read in detail | Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत कसा आणि किती पडेल पाऊस? वाचा सविस्तर

देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो.

देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : देशामध्ये ऑक्टोबर महिन्यात यंदा चांगल्या पावसाचे संकेत दिले आहेत. या काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार ऑक्टोबर महिन्यात देशामध्ये ७५.४ मिमी पाऊस पडतो.

यंदा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील त्याची नोंद होईल, असे हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी (दि.१) जाहीर केले.

यंदा हवामान विभागाने नैर्ऋत्य मान्सूनमध्ये १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार अधिक पाऊस झाला. आता ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान ईशान्य मान्सूनदेखील सरासरीपेक्षा अधिक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

ईशान्य मान्सून आणि मान्सूनोतर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडत असतो. यंदाच्या हंगामात दक्षिण भारतात ११२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविली आहे. या कालावधीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

दरम्यान, वायव्य भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. उर्वरित देशात मान्सून सक्रिय आहे. मान्सून वारे देशातून गेल्यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा सीमावर्ती भाग, रायलसीमा, केरळ, दक्षिणअंतर्गत कर्नाटक या भागात ईशान्य मोसमी वारे सक्रिय होतात.

हे वारे बंगालच्या उपसागरावरून बाष्प घेऊन येतात आणि दक्षिण भारतात पाऊस आणतात. दक्षिण द्वीपकल्पासह, मध्य भारत, पूर्वेकडील राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशाचा अति उत्तरेकडील राज्यांसह वायव्य आणि ईशान्य भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी अधिक पावसाचा अंदाज आहे.

तीन दिवस पाऊस !
नवरात्र उत्सवाच्या अगोदर बुधवारी (दि.२) पुण्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असणार आहे. तर ६ ऑक्टोबरपासून पुन्हा तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

महाराष्ट्र राज्यात यंदाच्या मान्सून हंगामात १२६ टक्के पाऊस झाला आहे. सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडणार याचा अंदाज यापूर्वी वर्तविला होता, तो खरा ठरला. २०२३चा पाऊस पाहता २०२४चा अंदाज राज्यासाठी खूप महत्त्वाचा होता. तो तंतोतंत खरा ठरल्याचा आनंद आहे. - कृष्णानंद हौसाळीकर, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे

Web Title: Maharashtra Weather Update : Signs of good rain this October How and how much rain will fall? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.