Join us

Maharashtra Weather Update :  नैऋत्य मौसमी पाऊस 'या' जिल्ह्यांमध्ये लावणार हजेरी; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 10:03 AM

राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागात पाऊस पडणार असून हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील दोन ते तीन दिवस नैऋत्य मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

त्यामुळे आज ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील चार उपविभागांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. कोकण, गोव्यामध्ये आज(९ ऑक्टोबर) व उद्या(१० ऑक्टोबर) रोजी काही ठिकाणी तर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात आज व उद्या तुरळक ठिकाणी तर पुढील दोन दिवस म्हणजेच १० व ११ ऑक्टोबरला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात पुढील सातही दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात सुद्धा पुढील दोन दिवस काही ठिकाणी त्यानंतर चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

आज(९ ऑक्टोबर) रोजी कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यात नांदेड व लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना वीजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे व पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

आज (९ ऑक्टोबर) रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यांसह वीजांच्या कडकडात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

तर विदर्भात अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या (१० ऑक्टोबर) रोजी रायगड, रत्नागिरी तसेच मध्य महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा व मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा , वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ ऑक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्राच्या, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे व तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. १२ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या दिवशी अहमदनगर व पुणे जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप लक्षात घेऊन पशुंना कोरड्या आणि सुरक्षित जागी बांधावे. तेथे चारा आणि पाण्याची सोय करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणगोवामहाराष्ट्रमराठवाडा