Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार; थंडीबरोबर पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार; थंडीबरोबर पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : The direction of winds in Maharashtra will change; Chance of rain with cold | Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार; थंडीबरोबर पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार; थंडीबरोबर पाऊस पडण्याची शक्यता

राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : राज्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागला असून १७ ठिकाणांचे तापमान १५ अंशांखाली आले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किमान तापमनात चांगलीच घट झाली असून, त्यामुळे पुण्यासह उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण राज्यात गारठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

पुढील पाच दिवस किमान कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. पुण्यातील एनडीए भागातील किमान तापमान १० अंशावर नोंदवले गेले. महाबळेश्वरपेक्षाही अनेक शहरे थंड झाली आहेत.

मुंबई १८ अंशावर असून, थंडीच्या मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. रविवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास राहील, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेया शेटटी यांनी दिली. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी मुंबईकरांना आल्हादायक वातावरणाचा आनंद लुटता येणार आहे.

३० नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा थंडी
-
हरियाणा, पंजाब आणि राजस्थान दरम्यान हवेच्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड कोरड्या वाऱ्याचा परिणाम म्हणून थंडीत वाढ होत आहे. २७ नोव्हेंबरपासून थंडीत घट होण्याची शक्यता आहे.
- २७ ते ३० नोव्हेंबर दरम्यान सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असेल. काही ठिकाणी पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
- ३० नोव्हेंबरनंतर पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

१५ अंशांखाली आलेली ठिकाण
पुणे : १२.२
लोहगाव : १४.९
अहिल्यानगर : १२.३
महाबळेश्वर : १२.५
मालेगाव : १४.२
नाशिक : १२.४
सांगली : १४.९
सातारा : १३.६
धाराशिव : १४.६
छ. संभाजीनगर : १३.८
परभणी : १४.५
बुलढाणा : १५
ब्रह्मपुरी : १४
चंद्रपूर : १४.८
गोंदिया : १३.४

महाराष्ट्रातील किमान तापमानात २३ नोव्हेंबरपासून काही दिवसांपर्यंत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रातील वाऱ्यांची दिशा बदलणार आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आणि त्याच्या संभाव्य हालचालीमुळे, २८ नोव्हेंबर दुपार/संध्याकाळपासून पुढील ३-४ दिवसांपर्यंत महाराष्ट्राच्या दक्षिण/मध्य भागांमध्ये (पुणे देखील) हलक्या पावसाची शक्यता आहे. - डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामानशास्त्रज्ञ

Web Title: Maharashtra Weather Update : The direction of winds in Maharashtra will change; Chance of rain with cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.