Join us

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून तूर्तास सुटका नाही; काय आहे कारण जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:11 IST

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उकाड्याला (heat) सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच उकाड्याला (heat) सुरुवात झाली असून, आता ही उष्णतेची लाट आणखी तीव्र होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सअसपर्यंत पोहोचला आहे. मुंबई (Mumbai Heatwave) आणि उपनगरांमध्ये मंगळवारचा दिवस यंदाच्या वर्षातील उष्ण दिवस (heat) ठरला. मुंबईत कुलाबा(Colaba) येथे मंगळवारी ३८ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ येथे ३९ अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. या वाढत्या तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. येत्या २४ तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला नसला तरीही वातावरण मात्र उष्ण आणि दमट राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (heat)

कोकण किनारपट्टीसह ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मागील ४८ तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर येथील भागाता हवा उष्ण आणि दमट असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (heat)

विदर्भातही परिस्थिती वेगळी नाही. नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागात उष्णता (heat) तीव्र होत असून, तापमानाचा पारासुद्धा ३७ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना इतक्यात तरी या उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. दुपारी १२ ते ४ या वेळेच उन्हाची तीव्रता अधिक असल्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी.

* वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भमराठवाडाकोकणमुंबई