Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा; काय आहे आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा; काय आहे आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update: There will be some relief from the heat; What is today's weather forecast? | Maharashtra Weather Update: उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा; काय आहे आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update: उकाड्यापासून काहीसा मिळणार दिलासा; काय आहे आजचा हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. (weather forecast)

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यातील काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. (weather forecast)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : राज्यातील हवामानात गेल्या दोन दिवसापासून काहीसा बदल झाला आहे.  ढगाळ हवामानामुळे राज्यातील  काही भागांमध्ये उष्णता काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळाले.  (weather forecast)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात तापमानाचा आकडा वाढत असताच एकाएकी राज्यावर पावसाळी ढगांचे सावट पाहायला मिळत आहे.
तापमान वाढल्याने बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, त्याच कारणास्तव पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसत आहे. (weather forecast)

सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातील विदर्भातून उष्णतेची लाट ओसरली असून, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भाग आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (weather forecast)

मुंबई शहर, उपनगर आणि राज्याच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर आता हवामानात मोठा बदल होताना दिसत आहेत. त्यामुळे येत्या पाच दिवसात मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी वारे वाहणार असून वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील, असे हवामान विभागाने कळविले आहे.

उष्णतेची लाट ओसरली?

राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांना करावा लागत होता. काही ठिकाणी तर तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. येत्या ५ दिवसात आता उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

* कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा येलो अलर्ट; काय आहे अंदाज वाचा सविस्तर

Web Title: Maharashtra Weather Update: There will be some relief from the heat; What is today's weather forecast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.