Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

Maharashtra Weather Update : Today rain will get a holiday;  But will be present in 'this' district  | Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

आज राज्यात पाऊस कुठे घेणार विश्रांती तर कुठे बरसणार जोरदार ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

आज राज्यात पाऊस कुठे घेणार विश्रांती तर कुठे बरसणार जोरदार ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update :

राज्यात मागील आठवड्यात पावसाने जोरदार बॅटींग केली.  पुणे, मुंबईसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. मात्र, राज्यातील काही भागात पाऊस आज सुट्टी घेणार असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (२९ सप्टेंबर) रोजी  कोकण, गोव्यातील  काही जिल्ह्यांत तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पुणे जिल्ह्यात घाट विभागात तर रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

त्याबरोबरच पुण्यातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज रविवारी (२९ सप्टेंबर) रोजी विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या सोमवारी (दि ३०) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना वीजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला 

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या पशुंना बधिस्त आणि सुरक्षित जागी बांधून ठेवावे. 

सोयाबीन, मका, ज्वारी या पिकांची काढणी करावी आणि कोरड्या, सुरक्षित जागी साठवणुक करावी.

पावसाची उघडीप लक्षात घेऊन कापूस आणि भाज्यांवर फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Weather Update : Today rain will get a holiday;  But will be present in 'this' district 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.