Maharashtra Weather Update : राज्यात फेंगल चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. थंडी तर जाणू गायब झाली असून तर पाऊस हजेरी लावताना दिसतोय.
राज्याच्या हवामानात मागील आठवड्यात मोठा बदल झाला आहे. राज्यातून थंडी गायब झाली आहे. तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच अवकाळी पावसाचे संकट देखील राज्यावर घोंगावत आहे.
काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पुढील काही दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून तापमानात देखील वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानात बदल झाला असून डिसेंबर महिन्यात मे महिन्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे.
मागील १६ वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईचे तापमान हे ३७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. राज्याच्या तापमानात ३ ते ६ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. या तापमान वाढीसोबतच राज्यात अवकाळ पाऊस हजेरी लावत आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली व पुण्यातील घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुरुवारी (५ डिसेंबर) रोजी काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धारशिव काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला.
पुढील काही दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे. त्यामुळे कडक्याची थंडी पाडण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
मराठवाड्यातील हवामान
मराठवाड्यात गुरुवारी लातूर, धारशिव काही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळी पावसाने हजेरी लावली.
शेतकऱ्यांना सल्ला
सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामुळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी पावसाची उघडीप बघून किटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.