Maharashtra Weather Update : पश्चिम बंगालच्या खाडीत दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाले आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रात थंडीची चाहुल लागण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे. पहाटेच्या वेळी थंड वारे सुटत आहे. तर दिवसा तापमानाचा पारा चढतो आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशभरात ला नीनो चा परिणाम नोव्हेंबर महिन्यात दिसेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात उष्णता जाणवणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात आज (७ नोव्हेंबर) रोजी दिवसा वातावरण कोरडे राहील, मात्र तापमानाचा पारा रात्री आणि पहाटे कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
१९-१७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यातील ग्रामीण भागात थंडीला सुरुवात झाली आहे. हवेत गारवा निर्माण झाला आहे.
त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन निर्माण झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच ला निनोचा प्रभाव असल्याने नोव्हेंबरचा दुसरा आठवडा आला तरी अजून तपामानात अपेक्षित घट झाली नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.
हा प्रभाव आणखी किती दिवस राहणार का ? हे पाहावे लागणार आहे. बे ऑफ बंगालच्या खाडीत होत असलेले सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि त्यामुळे हवामानात होणारे बदल यावरही हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. सध्या त्याचा थेट महाराष्ट्राच्या हवामानावर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
हवामानात कुठे झाला बदल
* दिवाळीनंतर पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. आज बहुतांश जिल्ह्यात कमाल आणि किमान तापमानात मोठी तफावत दिसत आहे. सातारा जिल्ह्यात देखील थंडीचा जोर वाढत आहे. दिवसा ऊन तर रात्रीच्या वेळी हवेत गारवा जाणवत आहे. किमान तापमानात पुन्हा घट झाली असून आज १७ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान तिशीपार राहील.
* सांगली जिल्ह्यात संमिश्र वातावरण असून ऊन तर मध्येच ढग पाहायला मिळत आहे. त्यामुळे याचा परिणाम शेती कामावर होत आहे. जिल्ह्यात आज तापमान स्थिर असून ३२ अंश कमाल तर १९ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील सकाळी धुके, दुपारी ऊन तर रात्री हवेत गारवा जाणवत आहे. आज देखील आकाश निरभ्र राहणार असून स्वच्छ सूर्यप्रकाश असणार आहे.
* कोल्हापूरमध्ये आज ३२ अंश कमाल तर १९ अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. सोलापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. तर दुपारी उन्हाच्या कडाक्याने नागरिक हैराण आहेत. आज स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश असणार आहे. सोलापूरमध्ये कमाल तापमान ३३ तर किमान १७ अंश सेल्सिअस राहील.
शेतकऱ्यांना सल्ला
* थंडी वाऱ्यापासून पशुधनाचे संरक्षणासाठी खिडकी व दरवाज्यांना गोण्याचे पडदे लावावेत.
* पूर्ण वाढ झालेल्या फळांची काढणीस तयार असलेल्या सिताफळ फळांची काढणी करावी व प्रतवारी करून बाजारपेठेत पाठवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.