Join us

Maharashtra Weather Update : येत्या 3 दिवसात राज्यातील तापमानात काय होतील बदल; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 09:40 IST

Maharashtra Weather Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात कसे बदलणार आहेत ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: नवीन तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) सध्या जम्मू काश्मीर आणि त्यालगत उत्तर पाकिस्तानमध्ये चक्राकार वारे(Cyclonic Wind) वाहत आहेत. त्यामुळे राज्यातील हवामान येत्या ३ दिवसात वातावरणात बदल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाला(Rain) पोषक स्थिती होती. याच काळात अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

राज्यात येत्या ३ दिवसात तापमान वाढणार असल्याचे हवामान(weather) विभागाने वर्तविले आहे. त्यामुळे दिवसा उष्ण वातावरण असेल त्यामुळे उकाड्याला सामोरे जावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रीय होणार आहे त्यामुळे किमान तापमानात वाढणार आहे.

IMD ने  दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २ ते ४ अंश सेल्सिअसने तापमानात वाढ  होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर विदर्भात ४ ते ५ अंशाने तापमानात घट होण्याची शक्यता आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. तर येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

शेतकऱ्यांना सल्ला

* पेरणी केलेल्या गहू पिकास राहिलेले अर्धे नत्र १०९ किलो युरिया प्रति हेक्टरी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी देऊन आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.

* आंबा बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : नववर्षाच्या स्वागताला गुलाबी थंडी; वाचा आजचा IMD रिपोर्ट

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळमराठवाडाकोकणमहाराष्ट्रविदर्भ