Join us

Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 09:21 IST

Maharashtra Weather Update : चक्राकार वारे वाहताना दिसत आहेत त्यामुळे हे वारे आता मध्य महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या परिसरात पुढे सरकत आहेत. त्यामुळे अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहे.

Maharashtra Weather Update: मागील आठवड्यापासून राज्यात तापमानात चढ-उतार पहायला मिळत असून अवकाळी पावसासाठी(Rain) हवामान पोषक स्थिती पहायला मिळत आहे. आता थंडी परतल्याने किमान तापमान (Temperature) १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे.

आता पुन्हा अरबी समुद्रात आर्द्रता वाढली असून मध्य महाराष्ट्रात चक्राकार वारे(Cyclone) सक्रीय झाले आहेत. त्यामुळे राज्यातील  तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली असून गारठा कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १-३ अंशांनी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यातील तापमान कमी होणार असल्याचे सांगण्यात आले असून ३-५ अंश सेल्सिअसने किमान तापमानात घसरण होणार आहे.

हवामानाचा अंदाज काय?

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, सध्या विस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर पाकिस्तान भागात सक्रीय आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्र आणि इतर भागावर आहे. अरबी समुद्रात आर्द्रता वाढल्याने तापमानात बदल होत आहेत. राज्यात बहुतांश भागात येत्या २-३ दिवसात तापमानात घसरण होणार असून, ३-५ अंश सेल्सिअस राज्यात किमान तापमानात घट होईल.

सोमवारी(६ जानेवारी) रोजी राज्यात विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानात वाढ होताना दिसली. येत्या २४ तासांत थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे .

शेतकऱ्यांना सल्ला

* पूर्व हंगामी ऊसाची लागवड करून सहा ते आठ आठवडे झाले असल्यास २६० किलो युरिया प्रति हेक्टरी देऊन पाणी द्यावे. नविन लागवड केलेल्या ऊस पिकात खुरपणी करून तण नियंत्रण करावे.

* अंबे बहार धरलेल्या संत्रा/मोसंबी बागेत वाळलेल्या व रोगग्रस्त फांद्याची छाटणी करावी व छाटणी केलेल्या फांद्यावर बोर्डो पेस्ट लावावी, असा सल्ला देण्यात आला आहे.हे ही वाचा सविस्तर :  २०२४ खरेच सर्वात उष्ण वर्ष होते का? काय सांगतायत हवामान तज्ञ; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानचक्रीवादळमहाराष्ट्रविदर्भमराठवाडा