राज्यातील हवामानात सातत्याने बदल (Weather change) होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच किमान तापमानात मोठी वाढ होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत मात्र चित्र काहीसे वेगळे पाहायला मिळत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागांतील तापमानात वाढ तर काही भागांत घट होताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रात काहीशी अशीच स्थिती असल्याचे बघायला मिळले. राज्यात सरासरी किमान तापमानाचा पारा हा ३६-३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंद करण्यात आला.
मराठवाड्यात आणि विदर्भात पहाटेच्या वेळी गारठा जाणवत आहे तर दुपारच्या वेळी उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* रब्बी ज्वारी पिकास कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर ९० ते ९५ दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. 'व्हॅलेंटाइन्स डे'मुळे (Valentine's Day) बाजार पेठेत गुलाब फुलांना अधिक मागणी असते काढणीस तयार असलेल्या गुलाब फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.