Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट; IMD चा वाचा सविस्तर रिपोर्ट

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट; IMD चा वाचा सविस्तर रिपोर्ट

Maharashtra Weather Update: Which districts of Marathwada, Vidarbha have been alerted; Read IMD's detailed report | Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट; IMD चा वाचा सविस्तर रिपोर्ट

Maharashtra Weather Update : मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट; IMD चा वाचा सविस्तर रिपोर्ट

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने सध्या रौद्र रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत IMD ने काय दिला आहे आजचा(६ सप्टेंबर) चा हवामान अंदाज जाणून घेऊया सविस्तर. (Maharashtra Weather Update)

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने सध्या रौद्र रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत IMD ने काय दिला आहे आजचा(६ सप्टेंबर) चा हवामान अंदाज जाणून घेऊया सविस्तर. (Maharashtra Weather Update)

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने सध्या रौद्र रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत IMD ने काय दिला आहे आजचा(६ सप्टेंबर) चा हवामान अंदाज जाणून घेऊया सविस्तर.

राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा मुक्काम आता आणखीन काही दिवस वाढणार असे दिसत आहे.

 राज्यभरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून २ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने  मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक देखील वाया गेल्याचे पाहायला मिळले.  त्याचबरोबर अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती.

त्यानंतर मात्र या भागातला पाऊस काही प्रमाणात कमी झाला होता. सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस सुरू आहे. मात्र विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा धोक्याचा इशारा  

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. तसेच, पुढील ५ दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय.  मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. 

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Web Title: Maharashtra Weather Update: Which districts of Marathwada, Vidarbha have been alerted; Read IMD's detailed report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.