Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात घसरण (Temperature drop) झाली आहे. सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रावात (Western disturbance) निर्माण झाला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत होते.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पण त्यानंतर तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होणार असून विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मागील दोन दिवसांपासून तापमानात चढ-उतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाल्याने येत्या ४८ तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने कळविले आहे.
महाराष्ट्रातील हवामान कसे?
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या २४ तासात तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने घट होणार असून किमान तापमान घसरणार होणार आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात दोन दिवसानंतर तापमानात वाढ होणार असून हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात पुढील पाचही दिवस हवामान कोरडे राहणार असून थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या १० व ११ जानेवारी रोजी पावसाचा अंदाज देण्यात आला असून शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गायी म्हशीमध्ये ऋतुकाळ चक्र २१ दिवसांचे असते. ऋतुकाळ चक्राच्या एकूण ४ अवस्था असतात.
* ऋतूकाळ चक्राच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जनावरे माजाची लक्षणे दाखवतात.
* माजाचा काळ हा गायी म्हशीमध्ये २४ तासाचा असतो. माजाच्या काळात गायी म्हशीमध्ये कृत्रीम रेतनाद्वारे जनावरे भरवुन घ्यावीत.हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : चक्राकार वाऱ्याचा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर