Join us

Maharashtra Weather Update : विदर्भासह मराठवाड्यात 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 9:51 AM

राज्यात आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात आज कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज (८ ऑक्टोबर) रोजी वातावरणात बदल होत आहे. कुठे जोरदार पाऊस तर कुठे ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पाऊस पडतो आहे. तर काही जिल्ह्यांत ऑक्टोबर हिट जाणवत आहे.दरम्यान आजपासून पुढील काही दिवस राज्यातील कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत परतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. आज सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता आहे.IMD  ने  दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस गुजरात आणि मध्य प्रदेशच्या उर्वरित भागातून तर महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.आज गोव्यासह संपूर्ण राज्यात पुढील तीन दिवस तुरळक भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर त्यानंतरचे दोन दिवस कोकण गोवा मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भातील काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.त्यानुसर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यास हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

८ व ९ ऑक्टोबरला वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात व ९ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्ह्यात आणि १० ऑक्टोबर रोजी बुलढाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि घाट परिसर पुणे आणि घाट परिसरासाठी आज आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर उद्या ८ ऑक्टोबर पासून पुढील पाच दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः अभाळ राहण्याची व मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विदर्भातील हवामान

विदर्भात काही जिल्ह्यात  मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाट मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  विदर्भातील काही  जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात उद्या(९ ऑक्टोबर) रोजी नागपूर मध्ये देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. 

मराठवाड्यातील हवामान

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

शेतकऱ्यांना सल्ला

शेतकऱ्यांनी पावसाची उघडीप लक्षात घेऊन रब्बीतील कामांना सुरुवात करावी. आपल्या पशुंना ऊन, वाऱ्यांपासून बचाव करावा. त्यांना कोरड्या आणि सुरक्षित जागी बांधावे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसकोकणगोवाविदर्भमराठवाडा