Join us

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील "या" जिल्ह्यात यलो अलर्ट; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 9:37 AM

राज्यात आज (२९ ऑगस्ट) रोजी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर माहिती. (Maharashtra Weather Update)

राज्यात आज (२९ ऑगस्ट) रोजी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात आणि कोकणात व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.  त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य बंगालचा उपसागर व लगतच्या भागावर वाऱ्याची एक चक्रीय स्थिती तयार झाली आहे. त्याच्या प्रभावाखाली आज २९ तारखेला उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.  यामुळे आज राज्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण गोव्यामध्ये पुढील पाच ते सात दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

रत्नागिरी येथे पुढील चार ते पाच दिवस सिंधुदुर्ग येथे पुढील दोन दिवस तर ठाणे येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पुणे व सातारा येथील घाट विभागात पुढील चार ते पाच दिवस तर कोल्हापुर येथे आज तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

जळगाव व अहमदनगर येथे उद्यापासून तीन ते चार दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोलापूर हिंगोली नांदेड लातूर व धाराशिव येथे ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उद्या ३० तारखेपासून मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलेला आहे. तरी शेतकऱ्यांनी त्यानुसार पिकांचे नियोजन करावे, तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसऔरंगाबादपुणेविदर्भजळगाव