Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : Yellow alert issued in these districts due to cold wave in the state | Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : चक्रीवादळामुळे राज्यात थंडीची लाट या जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी वाचा सविस्तर

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे.

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. किमान आणि कमाल तापमानातही घट होत आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागात धुक्याचे प्रमाण वाढले आहे, तर गुरुवारी (दि. २८) मध्य प्रदेशातील मांडला येथे देशातील सर्वांत कमी ६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नगरमध्ये सर्वांत कमी ९.५ किमान तापमान होते. राज्यात नाशिक, नगर आणि पुण्यामध्ये थंडीच्या लाटेचा 'यलो अलर्ट' जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळी प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात थंडीचा कडाका असाच कायम राहणार आहे. मध्य प्रदेशातील मांडला येथे गुरुवारी (दि. २८) ६.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली, तर धुळे आणि निफाड येथे ८ अंशावर तापमान होते.

पुण्यातील 'एनडीए'मध्ये ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे पुणेकरही चांगलेच गारठले आहेत. नाशिक, नगर आणि पुणे या भागात थंडीची लाट येणार असून, तिथे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढला असून, गुरुवारी (दि. २८) धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नगर येथे ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यात आणखी घट होऊ शकते. राज्यातील तापमानातील घट कायम राहू शकते, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

चक्रीवादळामुळे वाढ?
मुंबईच्या किमान तापमानात दोन दिवसांनी वाढ होण्यास सुरुवात होईल. दक्षिण भारतात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ही वाढ नोंदवली जाईल. या काळात थंडीचा जोर ओसरेल. ७ डिसेंबरनंतर पुन्हा खाली घसरण्यास सुरुवात होईल आणि एकदा थंडीचा जोर वाढेल, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेया शेट्टी यांनी दिली.

राज्यभर थंडीचा कडाका
राज्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान हे ८ ते १४ अंश सेल्सिअसमध्ये नोंदवले जात आहे. पुण्यातील 'एनडीए'चा समावेश आहे. महाबळेश्वरला सर्वांत अधिक थंडी पडते. पण, या वेळेस इतर ठिकाणी तिथल्यापेक्षाही कमी तापमान आहे.

कुठे किती तापमान ? (अंश से.)
अहिल्यानगर : ९.५
पुणे : ९.८
बारामती : १०.२
नाशिक : १०.५
उदगीर : १०.५
जळगाव : ११.२
महाबळेश्वर : ११.५
परभणी : ११.५
धाराशिव : १२.४
सातारा : १२.५
सोलापूर : १४.६
सांगली : १४.९
कोल्हापूर : १५.१
माथेरान : १५.२
डहाणू : १७.३
मुंबई : १८.७

उत्तर भारतातून येणारे थंड वारे, तसेच वायव्य आशियातून, आपल्याकडे आणि उत्तर भारतात नियमितपणे एकापाठोपाठ मार्गक्रमण करणारे पश्चिमी वाऱ्याचे प्रकोप होत आहेत. त्यामुळे थंडीचा वाढली. पुढील पाच दिवस ही थंडी कायम राहू शकते किंवा अजून वाढू शकते. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ, पुणे

Web Title: Maharashtra Weather Update : Yellow alert issued in these districts due to cold wave in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.