राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागत असून आज राज्यात पुण्यासह १५ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये (Maharashtra weather update) उष्ण व दमट हवमान राहणार असल्याचे हवामान विभागाने नोंदवले.
नैऋत्य मोसमी पावसाची अरबी समुद्राच्या मध्य भागात प्रगती होत असून पुढील आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. चक्राकार वाऱ्यांची बंगालच्या उपसागरात सक्रीय स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
दरम्यान, राज्यात पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट?
यलो अलर्ट- अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर,बीड, नांदेड, लातूर, धाराशिव,भंडारा, गोंदिया, नागपूर,वर्धा
पुढील पाच दिवस राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी लागणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.