Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update : कोकणात या जिल्ह्यात १ नोव्हेंबर पर्यंत यलो अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : कोकणात या जिल्ह्यात १ नोव्हेंबर पर्यंत यलो अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : yellow alert till 1st November in this district in Konkan area read in detail | Maharashtra Weather Update : कोकणात या जिल्ह्यात १ नोव्हेंबर पर्यंत यलो अलर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : कोकणात या जिल्ह्यात १ नोव्हेंबर पर्यंत यलो अलर्ट वाचा सविस्तर

जिल्ह्यात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

जिल्ह्यात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

तसेच ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून स्रोतांपासून अलग करून ठेवावीत. दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये.

घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजेच्या खांबांपासून लांब राहावे. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.

वीज पडण्याची पूर्वसूचना मिळण्याकरिता आपल्या मोबाइलवर 'दामिनी अप' डाऊनलोड करून घ्यावे. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये.

मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे, अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

कुठल्याही मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्रांकडून करून घ्या किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष किंवा पोलिस हेल्पलाइन क्रमांक ११२ वर संपर्क करा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

घराबाहेर पडणे टाळा
-
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या.
अतिमुसळधार पावसात व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.
पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये, मोबाइलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे.
- अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Maharashtra Weather Update : yellow alert till 1st November in this district in Konkan area read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.