Maharashtra Weather Update : महाशिवरात्रीच्या दिवशी राज्यात विविध शहरात तापमानात आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. मुंबईतील तापमानात बहुतांश वाढ होऊन हवामान विभागाकडून (IMD) उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलाय. मुंबईतील कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात तापमानात देखील आणखी वाढ झालेली दिसून येत आहे. फेब्रुवारीअखेरीस पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच उकाडा आणि उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात मुंबई व कोकणपट्ट्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात ३७ ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाची धग वाढली आहे.
येत्या ५ दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत देण्यात आले आहे. आज (२६ फेब्रुवारी) रोजी मुंबईसह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट (yellow alert) देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात संपूर्ण कोकणपट्ट्यात उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान नोंदवले जात आहे. मागील दोन दिवसांपासून नागरिकांना उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* केळी, आंबा व द्राक्ष बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.
* आंबा बागेत वटाणा व सुपारीच्या आकाराच्या आंबा फळांची गळ दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी बागेत एनएए १५ पीपीएम ची फवारणी करावी.
* काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Heatwave alert: राज्यात 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर