Maharashtra Weather Updates:
राज्यात काल (३ ऑक्टोबर) रोजी काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तर, बहुंताश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळले.राज्यात येत्या चार दिवसात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आज पुणे, सातारा, धुळे आणि राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (४ ऑक्टोबर) रोजी पुणे, सातारा, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.तर, उद्या शनिवारी आणि रविवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील. तर, इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असेही सांगण्यात येत आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाची शक्यता लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.