Join us

Maharashtra Weather Updates : चक्राकार वाऱ्यांची स्थितीचा काय होईल परिणाम ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 09:30 IST

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली होता.

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचेRain संकट उभे राहिले आहे. काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामानweather विभागाने वर्तविली होता.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात ३०-४० किलोमीटर वेगाने वारेstorm वाहणार आहे. तसेच काही भागांत पावसाचा इशाराही हवामान विभागाने वर्तविली आहे.

IMD ने  दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बदलांमुळे राज्यात पावसाच्या सरी बरसत आहेत. दक्षिण केरळ लगतच्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकारcyclonic वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होताना दिसत आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस अन् गारपीट होत आहे. राज्यातील १२ ते १३ जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. साधारण २० मिनिटे पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.  तर नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला.

अवकाळी फटका

जळगाव जिल्ह्यांत सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे ज्वारी, दादर तसेच केळी आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसला आहे.

जळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे ज्वारी, दादर ही पिके जमीनदोस्त झाली आहे. अवकाळी पावसामुळे हरभऱ्यावर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. हरभऱ्याचे उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता आहे. रावेर व यावल तालुक्यात केळीच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला असून केळी उत्पादक शेतकऱ्यांचे देखील त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तूर काढणीवर आली असताना झालेल्या पावसामुळे तुरीचे सुद्धा मोठे नुकसान होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* करडई पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

* हरभरा पिकास आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. हरभरा पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : कोकणात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसनाशिकमराठवाडाविदर्भमहाराष्ट्रचक्रीवादळ