Pune : राज्यभरात रब्बीच्या हंगामाला सुरूवात झालेली आहे. मान्सूनच्या पावसाने मागच्या महिन्यात राज्यातून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावारण कोरडे असून पाऊसही नाही. शेतकर्यांना यामुळे रब्बीच्या पेरण्या करण्यासाठी वापसा तयार झाला आहे. तर अजून हवी तेवढी थंडी नसल्यामुळे शेतकरी गहू पेरणीची प्रतीक्षा करत आहेत.
दरम्यान, नैऋत्य मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातून संपला असला तरी देशातील काही ठिकाणी ईशान्य मान्सूनचा पाऊस सुरू आहे. येणाऱ्या दोन महिन्यात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात राज्यात अनुकूल स्थिती निर्माण झाली तर ईशान्य मान्सूनचा पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
येणाऱ्या पाच दिवसांत राज्यात एकाही तालुक्यांत, तालुक्यांत आणि जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. तर वातावरण कोरडे राहणार आहे. राज्यात कुठेही पावासाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आलेला नाही. यामुळे पावसाने राज्यातून रामराम ठोकला असं म्हणायला हरकत नाही.
पाऊस नसल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले आहे. आणि नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असूनही तापमान अपेक्षेएवढे कमी झालेले नाही. येणाऱ्या काळात तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर काही भागांत धुकेही पडू शकते अशी माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.