Join us

'उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन' 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 5:24 PM

महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारी पर्यंत जाणवणार

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार. सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व बर्फबारीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे रविवार दि.४ फेब्रुवारी पर्यंत थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजून अशीच १ फेब्रुवारी पर्यंत जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से. ग्रेड (म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर  पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, व छत्रपती संभाजीनगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिक) तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असू शकते असे वाटते.    

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होऊ शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल. नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमी पेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल.   

माणिकराव खुळे (Meteorologist Retd. IMD Pune)

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी