आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमधील एकूण पाणीसाठा आता ५८ टक्के इतका झाला आहे. दिनांक १४ जानेवारी सकाळी ६ पर्यंतचा हा पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात धरणांमध्ये ८२ टक्के पाणीसाठा होता.
पुणे विभागात ५९.३३%, नाशिक विभागात ६२. ६ टक्के, औरंगाबाद विभागात ३४.११ टक्के, अमरावती विभागात ६७.९८ टक्के, नागपूर विभागात ६५.३४ टक्के इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. हा पाणीसाठा जिवंत आणि मृत असा आहे.
कोकण विभागात तुलनेने चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा अवघा ४टक्क्यांवर आला आहे. दरम्यान काही निळवंडे, भोजापूर या धरणांतून आवर्तन सोडण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यात ज्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे, तेथून शेती व पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन असण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख धरणांमधील आजपर्यंत एकूण (उपयुक्त व मृत) शिल्लक पाणीसाठा असा आहे.
औरंगाबाद विभाग
- जायकवाडी: ४१.७७%
- मांजरा (बीड): १८.२५ %
- येलदरी (हिंगोली):५७.५६%
- विष्णुपुरी (नांदेड): ७०%
- निम्न तेरणा (धाराशिव): १२.१%
- लोअर दुधना(परभणी): १८.१०%
हेही वाचा : निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय
अहमदनगर
- भंडारदरा: ६०.३९%
- मुळा: ७१.१०%
- निळवंडे: ६९.७९%
जळगाव
- उर्ध्व हातनूर: ९८.३५%
- वाघूर: ८८.२२%
हेही वाचा : भोजापूर धरणातून पहिल्यांदा महिनाभर आवर्तन, दुष्काळी स्थितीत जमीन भिजली!
नाशिक
- गंगापूर:६७.८०%
- गिरणा: ४२.४६%
- दारणा:५४.४८%
- पालखेड: ७१.६१%
कोल्हापूर
- राधानगरी:७९.२७%
- तिलारी (धामने): ८६.७५%
पुणे
- निरा देवघर: ६०.४५%
- मुळशी:७४.७%
- पानशेत:८५.८२%
सांगली-सातारा
- वारणा (सांगली): ७६.६७%
- कोयना (सातारा): ७२.१६%
- वीर(सातारा): ५९%
सोलापूर
उजनी (भिमा): ४.७७%
कोकण विभाग:
- तिल्लारी (सिंधुदुर्ग): ८४.५९%
- तानसा (ठाणे) :७१.९८%
- भातसा(ठाणे): ७३.२%
- मोडकसागर(ठाणे): ६१.१५%