Join us

Manjara Dam : मांजरा यंदाही ओव्हरफ्लो; २५ वेळा उघडले दरवाजे ९५.४६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 11:24 AM

यंदा मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दखलपात्र पाऊस (Rain) झाला. वरुणराजा धो-धो बरसल्याने प्रकल्प २५ सप्टेंबरलाच 'ओव्हरफ्लो' झाला. तद्नंतर पुढचा महिनाभर मात्र मांजरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी 'उघडझाप' काळ ठरला असून, तब्बल २५ वेळा दरवाजे उघडझाप करून पाण्याचा तब्बल ९५.४६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग (Water Release) करावा लागला आहे.

बालाजी आडसूळ

यंदा मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दखलपात्र पाऊस झाला. वरुणराजा धो-धो बरसल्याने प्रकल्प २५ सप्टेंबरलाच 'ओव्हरफ्लो' झाला. तद्नंतर पुढचा महिनाभर मात्र मांजरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी 'उघडझाप' काळ ठरला असून, तब्बल २५ वेळा दरवाजे उघडझाप करून पाण्याचा तब्बल ९५.४६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे.

गोदावरी नदीची प्रमुख उपनदी असलेली मांजरा नदी बीड व धाराशीव जिल्ह्यांची नैसर्गिक हद्द बनत प्रवाही होते. या नदीवर १९८० च्यादरम्यान बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव व धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील दाभा गावच्या शिवेवर मांजरा प्रकल्पाची उभारणी झाली. महसुली हिशोबात बीड जिल्ह्यात अन् लातूरकरांच्या प्रशासकीय नियंत्रणात असलेल्या या मांजरा प्रकल्पाचा 'पाणलोट' मात्र पूर्णतः धाराशिव व बीड जिल्ह्यांतील.

याच पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या कळंब, वाशी, भूम या धाराशिव जिल्ह्यातील व केज, बीड, पाटोदा या बीड जिल्ह्यांतील भागात यंदा वरुणराजा धो-धो बरसला. यामुळे २५ सप्टेंबर रोजीच मांजरा प्रकल्प ओसंडून वाहिला. यानंतर लातूर, बीड, धाराशिव जिल्ह्यांतील बॅकलॉग व लाभक्षेत्रात एकदाचा 'आनंदीआनंद' झाला. पुढील महिना ते सव्वामहिन्याचा काळ मात्र पावसात सातत्य राहिल्याने मांजरा प्रकल्प व्यवस्थापनासाठी कायम 'अलर्ट मोड'वर गेला.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीची स्थिती

 क्षमतास्थिती
पाणीपातळी६४२.३७ मी.६३५.६० मी.
एकूण साठा२२४.०९३ दलघमी४५.४८९ दलघमी
मृतसाठा४७.१३० दलघमी४५.४८९ दलघमी
जिवंतसाठा१७६.९६३ दलघमी०००,००० दलघमी

या दिवशी मोठा विसर्ग

तारीखविसर्ग
२१ ऑक्टोबर८.५५ दलघमी
१९ ऑक्टोबर८.१९ दलघमी
१६ ऑक्टोबर५.८८ दलघमी

९५.४६ दलघमी पाण्याचा विसर्ग...

यंदा मांजरा प्रकल्प लवकरच भरल्याने शेतकरी, सास्वर कारखानदार, पाणीपुरवठा योजनांवर निर्भर असलेले लोकजीवन निश्चित झाले होते. यादरम्यान १९ दिवशी तब्बल २४ वेळा पाण्याचा सोडणे व बंद करण्याचा खेळ मांजरा प्रकल्प शाखा विभागाला करावा लागला. एकाच हंगामात अशी पहिल्यांदाच वेळ ओढवल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात ६ वेळा दोन दरवाजे, तर २ वेळा ३ दरवाजे उंचावून पाणी सोडण्यात आले.

सव्वामहिना 'उघडझाप' काळ...

२५ सप्टेंबरला मांजरा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला. याचदिवशी ०.२५ मीटरने दोन दरवाजे उंचावून पहिल्याच दिवशी ३.०९ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुढे या महिन्यात ५ दिवशी ९ वेळा दरवाजे उघडणे अन् बंद करण्याची प्रक्रिया घडली. पुढील ऑक्टोबर महिन्यात यात वृद्धी झाली. तब्बल १४ दिवसांत १५ वेळा अशीच उघडझाप करावी लागली. यात तब्बल ६६.४५ दलघमी पाणी सोडण्यात आले. चालू नोव्हेंबर महिन्यात मात्र एकदाच ही वेळ आली.

हेही वाचा : Snake Bite : रब्बीच्या पिकांना रात्री पाणी भरत आहात का? तर 'अशी' काळजी घ्या; सर्पदंशाची शक्यता नाकारता येत नाही

टॅग्स :मांजरा धरणशेती क्षेत्रजलवाहतूकधाराशिवशेती