Join us

Manjara Dam Water Storage मांजरा जिवंत साठ्यात; प्रकल्पात ४८.९५१ दलघमी झाला पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 9:24 AM

गेल्या पाच-सहा दिवसांपासून मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून लातूर जिल्ह्यासह मांजरा प्रकल्प क्षेत्रामध्ये पावसाची रिपरिप सुरूच असून, प्रकल्प क्षेत्रात आतापर्यंत ५१५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरावरील महासांगवीचा शंभर टक्के, तर संगमेश्वर मध्यम प्रकल्प ५७.३० टक्के भरला आहे. यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याचा मोठा संचय होत आहे. मृत आणि जिवंत साठा मिळून ४८.९५१ दलघमी पाणीसाठा आहे.

तीन दिवसांपूर्वीच मांजरा प्रकल्प जिवंत साठ्यात आला आहे. आता धरणात १.०३ टक्के जिवंत पाणीसाठा झाला आहे. सद्यःस्थितीत मांजरा धरणात १.८२१ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रकल्प क्षेत्रात ८०० मि.मी. पाऊस झाला, तर आतापर्यंत ५१४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणात ०.४५५ दलघमीची आवक आहे.

मांजरा नदीवरील लासरा गावापासून लातूर जिल्ह्यातील भुसणीपर्यंत असलेल्या १५ बॅरेजेसमध्ये ३२.६५ दलघमी पाणीसाठा झाला आहे. यामुळे लासरा गावापासून भुसणी गावापर्यंत मांजरा नदीपात्रात पाणी स्थिरावले आहे.

यंदा सिंचनाला पाणी मिळेल

• लातूर शहराच्या दृष्टीने मांजरा प्रकल्प भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा प्रकल्प बहुतांश वेळा परतीच्या पावसावर भरला आहे. यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभीपासून पाऊस पडत असल्यामुळे गेल्या दीड महिन्यामध्ये मांजरा प्रकल्पामध्ये ८.४४ दलघमी नवीन पाण्याचा संचय झाला आहे. गतवर्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. त्यामुळे सिंचनाला पाणी मिळाले नाही. पिण्यासाठीच पाणी आरक्षित ठेवले होते.

• यंदा प्रकल्प भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यामुळे शेतीला पाणी मिळणार आहे. सध्या प्रकल्पामध्ये १.८२० दलघमी जिवंत पाणी साठा झालेला आहे. मांजरा धरणाच्या वरील अप्पर मध्यम प्रकल्प दोन आहेत. त्यापैकी एक भरला असून, एक निम्याच्या वर आल्याने मांजरा प्रकल्पातही मोठा संच सुरू झालेला आहे. रविवारी आठ मिमी पाऊस झाल्यामुळे प्रकल्पात मोठा जलसंचय झाला असल्याचे मांजरा प्रकल्पाचे शाखा अधिकारी सूरज निकम यांनी सांगितले.

मांजरा नदीवरील बॅरेजेसमधील पाण्याची टक्केवारी

लासरा : २९बोरगाव : ००वांजरखेडा : ५७टाकळगाव : ५०.८९वांगदरी : ३६.१८कारसा : ३८.३० साई : ५१.३५नागझरी : ५०,७५खुलगापूर : ३७.३८बिंदगीहाळ: ७६.१५डोंगरगाव : ५३.६५धनेगाव : ६३.८२होसूर : ५८.८९भुसणी : ७५.१६एकूण :५०.३६ टक्के

६.९ मि.मी. पावसाची नोंद

रविवारी सकाळी ६.१ मि.मी. पाऊस झाला असून, आतापर्यंत ४५०.३ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाची रिपरिप आहे. ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू आहे.

हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता...

• मांजरा नदीवरील १५ बॅरेजेसमध्ये एकूण ५०.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर ३२.६५ दलघमी मांजरा पाणी उपलब्ध झाले आहे. शिवारामध्ये वापसा नाही.

• जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणी मुरले असल्याने पाणी पातळीत वाढ झालेली आहे. हवामान विभागाने लातूर धाराशिव जिल्ह्यात हालक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाचा जोर सोमवारपर्यंत राहील, असे संबंधित खात्याने म्हटले आहे.

हेही वाचा - Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

टॅग्स :पाणीमराठवाडालातूरमांजरा धरणजलवाहतूकपाऊसहवामानमोसमी पाऊसवादळ