Join us

Marathawada Rain : मराठवाड्याने पावसात गाठली शंभरी; पुढील हंगाम होणार सुखकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 2:53 PM

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. (Marathawada Rain)

Marathawada Rain :

छत्रपती संभाजीनगर :  मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांनी वार्षिक सरासरीची शंभरी ओलांडली आहे. पुढील दहा दिवसांत संमिश्र हवामान राहील, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे. आगामी काळात जोरदार पाऊस झाला तर खरीप हंगामातील पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. या तुलनेत आजवर ८०४ मि.मी. पाऊस झाला आहे. १२५ मि.मी. अधिक पाऊस झाला आहे. ३० सप्टेंबरला पावसाळा संपणार आहे. त्यानंतर होणारा पाऊस खरीप हंगामातील काढणीस आलेल्या पिकांना धोकादायक ठरू शकतो.

विभागात आजवर ११८ टक्के

• मराठवाड्यात आजवर ११८ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या आठवड्यात विभागात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. २९ सप्टेंबरच्या सकाळपर्यंत ०.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.

• सप्टेंबर महिन्यांत २२९ मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी ८३ टक्के पाऊस झाला होता. १५ ते १७ टक्के पावसाची तूट होती. सप्टेंबरमध्ये १७० मि.मी. पाऊस होणे अपेक्षित होते.

जिल्हानिहाय झालेला पाऊस असा...

जिल्हाटक्केवारी
छ. संभाजीनगर     १३१% 
जालना                १३४%
बीड                     १३६%
लातूर                 १११%
धाराशिव         १२०%
नांदेड            १०७%
परभणी            १०८%
हिंगोली      ११२%
एकूण        ११८%
टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमराठवाडा