Join us

Marathwada Dam : मराठवाड्यातील नांदेड वगळता इतर प्रकल्प पावसाच्या प्रतीक्षेत 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 10:53 AM

Marathwada Dam : मराठवाड्यात कोणत्या धरणात किती पाणी साठा उपलब्ध आहे. हे पाहुया.

Marathwada Dam :

यंदा अर्धावर पावसाळा संपला तरी मराठवाड्यातील धरणात मुबलक साठा उपलब्ध झाला नाही. आठ जिल्ह्यातील लघु, मध्यम, प्रकल्पांपैकी ५१ प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत.  मात्र, नांदेड जिल्ह्यातील विष्णूपुरी जलाशयात ८५ टक्के, तर लघु व मध्यम प्रकल्पात निम्म्याहून अधिक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नांदेड जिल्ह्यातील ८० लघु प्रकल्पात ५१ टक्के, तर मध्यम प्रकल्पात ७३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विष्णूपुरी जलाशय ८५ टक्के भरला आहे. इतर जिल्ह्यांची परिस्थिती मात्र चिंताजनक आहे. छत्रपती संभाजीनगर येथील १६ टक्के, बीड येथील १६ टक्के, जालना ९ टक्के, लातूर ३ टक्के व धाराशिव येथील ४ प्रकल्प कोरडेच आहेत.जायकवाडीतील उपयुक्त साठा ९ टक्क्यांवर आला आहे. येलदरी प्रकल्पात ३३ टक्के, उर्ध्व पैनगंगा ४९ टक्के, निम्न मनारमध्ये ६३ टक्के साठा उपलब्ध झाला आहे. परभणीतील दोन मध्यम प्रकल्पात ४८ टक्के, तर हिंगोलीतील २७ लघु प्रकल्पात केवळ ३० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाला तर भविष्यातील पाणी टंचाईची समस्या दूर होईल. 

टॅग्स :शेती क्षेत्रधरणशेतकरीशेती