राज्यात धरणपाणीसाठा तळाला पोहोचला असून मराठवाड्यात आज दिनांक पाच जून रोजी ८.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. बीड हिंगोली, धाराशिव जिल्ह्यातील धरणे शून्यावर जाऊन पोहोचली आहेत. दरम्यान हिंगोलीतील सर्वात अधिक क्षमतेचे सिद्धेश्वर धरण कोरडे झाले असून पाणीसाठा शून्यावर गेला आहे.
हिंगोलीतील सिद्धेश्वर व येलदरी धरणांवर नागरिकांची तहान भागते. यंदा दोन्ही धरणांमध्ये पाणीसाठा कमालीचा घटला असून नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. सिद्धेश्वर धरणात मागील वर्षी 17.16% पाणीसाठा शिल्लक होता.तो आता शून्यावर पोहोचला आहे. तर गेलं तरी धरणात मागील वर्षी 57.13% पाणीसाठा होता यंदा तो 26.74 टक्क्यांवर आहे.
जलसंपदा विभागाने दिलेल्या धरण पाणीसाठ्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजी नगर विभागात एकूण पाणीसाठा आता 8.44 टक्क्यांवर आला आहे. बीड धाराशिव हिंगोलीसह बहुतांश धरणांमधील पाणी आता कमी झाले आहे. मराठवाड्यात टँकरचे प्रमाण वाढले असून शेतीसह जनावरांना पिण्यास पाणी उरले नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.