मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून केवळ रिपरिप पाऊस सुरू आहे. तर अनेक भागात अध्याप ही मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी बांधवांना लागून आहे.
दरम्यान कोल्हापूर, पुणे, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील धरणाच्या वरचे धरण असलेल्या नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सध्या मराठवाड्याच्या धरणसाठ्यात दिवसानिक वाढ होतांना दिसून येत आहे.
याच अनुषंगाने सेवानिवृत जलसंपदा इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी लोकमत अॅग्रोला दिलेल्या महितीनुसार जाणून घेऊया मराठवाड्यातील धरण पाणीसाठा अद्ययावत माहिती.
दि.१ जुन २०२४ पासून दि. ०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ६=००वा.
जायकवाडी धरण
एकुण : ३६.१११२ TMC/३५.१५%
ऊपयुक्त : १०.०४५० TMC/१३.१०%
--------------------------------------------------
येलदरी : (ऊ) : ९.४२२ TMC/३२.९४%
माजलगाव : (ऊ) : ०.०० TMC/००.००%
पेनगंगा (ईसापुर) : (ऊ) : १७.५२४ TMC/५१.४७%
तेरणा : (ऊ) : ०.९४६ TMC/२९.३६%
मांजरा : (ऊ) : ००.१४५ TMC/०२.३२%
दुधना : (ऊ) : ००.८४५ TMC/९.८७%
विष्णुपुरी : (ऊ) : २.२८१ TMC/७९.९४%
सिध्देश्वर : (उ) : १.२६६ TMC/४३.०३%