Join us

मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार, या आठवड्यात सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज

By मुक्ता सरदेशमुख | Published: September 05, 2023 3:00 PM

मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिनांक 05 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर ...

मराठवाड्यात पुढील तीन दिवस बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिनांक 05 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 06, 07 व 08 सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी तर दिनांक 09 सप्टेंबर रोजी बऱ्याच ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 08 ते 14 सप्टेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला थोडासत्र दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 05 सप्टेंबर रोजी नांदेड व लातूर जिल्हयात बऱ्याच ठिकाणी तर दिनांक 06 सप्टेंबर रोजी परभणी, हिंगोली, जालना जिल्हयात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद व जालना जिल्हयात बहुतांश ठिकाणी दिनांक 07 सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता असून औरंगाबाद जिल्हयात ८ सप्टेंबर रोजी बहुतांश ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील एक ते दोन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 1 ते 2 अं.से. ने वाढ होऊन त्यांनतर तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 10 ते 16 सप्टेंबर 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

कुठे आहे पावसाची शक्यता?

दिनांक 05 सप्टेंबर- परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद

दिनांक 06 सप्टेंबर- बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड

दिनांक 07 सप्टेंबर- नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, लातूर, बीड

दिनांक 08 सप्टेंबर- हिंगोली, परभणी, जालना, बीड

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झालेले आहे.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमराठवाडामोसमी पाऊसपाऊसपाणीकृषी विज्ञान केंद्रशेती क्षेत्रशेतकरी