प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक २२ जुलै रोजी औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तर बीड व परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी दिला आहे.
मराठवाड्यासाठीचा पावसाचा अंदाज
दिनांक 23 जूलै रोजी नांदेड, हिंगोली व परभणी तसेच दिनांक 24 जूलै रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्हयात तर दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 22 जुलै रोजी बहुतांश ठिकाणी, दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दिनांक 25 जुलै रोजी नांदेड व लातूर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 23 ते 27 जुलै दरम्यान बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जूलै 2023 दरम्यान व दिनांक 28 जूलै ते 04 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
असा आहे विस्तारित अंदाज
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 26 जूलै ते 01 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल व किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा दर कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
पेरणीसाठी सल्ला
मराठवाडयात मागील 15 दिवसात ज्या तालूक्यात पेरणी योग्य पाऊस (75-100 मिमी) झाला नसल्यास (जालना जिल्हा : बदनापूर ; बीड जिल्हा : धारूर, परळी वैजनाथ, पाटोदा, वडवणी) शेतकऱ्यांनी दोन दिवसानंतर वापसा आल्यास पेरणी करावी.
पेरणी न झालेल्या ठिकाणी पेरणी योग्य पाऊस (75 ते 100 मिमी) झाला असल्यास सूर्यफुल, तूर, संकरीत बाजरी, सोयाबीन + तूर (4:2), बाजरी + तूर (3:3), एरंडी, कारळ आणि तिळ, एरंडी + धने, एरंडी + तूर ही पिके घ्यावीत.