Join us

Marathwada rain alert : मराठवाडयात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 3:16 PM

Marathwada rain alert : मराठवाडयात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  

 Marathwada rain alert :  मराठवाडयात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायम आहे. परंतू येत्या काही तासात मान्सून आता मराठवाडयात धडकणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईने दिली आहे. 

दिलेल्या अंदाजानुसार नांदेड, हिंगोली, परभणी व जालना, बीड, छत्रपती संभाजी नगर जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडयात दिनांक ०२  ते ०८ ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन फवारणीचे नियोजन करावे. तसेच पिकात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असा सल्ला परभणी कृषि विद्यापीठाने दिला आहे. 

असा असेल पावसाचा प्रवास २ ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी व जालना या जिल्हयात ताशी ३० ते ४०  कि.मी या वेगाने जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटांसह पाऊस पडणार आहे. ३ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड तसेच परभणी, नांदेड व हिंगोली या जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. ४ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कृषी सल्ला प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेला मुसळधार पावसाच्या अंदाजानूसार फवारणीची कामे तीन दिवस पुढे ढकलावीत व पावसाची उघाड बघून फवारणी करावी, पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने केली आहे. 

 

टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसमराठवाडापाणीशेतकरी