Marathwada Rain Updates : मागील दोन दिवसांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली होती. या पावसामुळे ओढे, नद्या, नाल्यांना पूर आला असून शेतं वाहून गेले आहेत. यामध्ये शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाताला आलेले पीक वाहून गेल्यामुळे (Crop Damage) शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे.
दरम्यान, मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यांत (Hingoli Rain) ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचा सर्वांत कमी सरासरी पाऊस पडला होता. पण १ सप्टेंबर रोजी येथे मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे गावांत पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक घरे आणि गाड्यांचे नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या हवानामाच्या अंदाजानुसार (Weather Forecast) आज महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता नसून मराठवाड्यात कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. त्याचबरोबर विदर्भातही कुठेच पावसाची शक्यता नाही पण येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यभरात कुठेच पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे मुसळधार पडल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे.(Maharashtra Weather Forecast Latest Updates)
शेतीतील माती गेली वाहूनपुराच्या जोरामुळे (Flood News) उभ्या पिकातील माती वाहून गेल्याने पीकही वाहून देले आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस पिकांचा मोठ्या प्रमाणावर सामावेश असून सपाट भागातील पिकांमध्ये गुडघ्या इतके पाणी साचले आहे. यामुळे पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे.
(Maharashtra Rain Latest Updates)