Marathwada Rain Update :
मराठवाड्यात २० ऑगस्टच्या रात्री सात जिल्ह्यांतील २२ मंडळांत जोरदार पावसाने हजेरी लावली. सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला असून, आजवर ७३.५ टक्के इतका पाऊस झाला आहे. २५ ऑगस्टपर्यंत रोज पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. २४ ऑगस्ट रोजी विभागातील तीन जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल. २० ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुर्काबाद, चिकलठाण, जालन्यातील केदारखेडा ग्रामीण भागात, तर बीड जिल्ह्यातील पाली, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, लिंबागणेश, चहाटा, घाटनांदूर, केज, धारूर मंडळांत जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यातील जगाजी, पारगाव मंडळांत तर नांदेडमधील धानोरा, परभणीतील बामणी, आवलगाव, सेलगाव, वडगाव, हिंगोलीतील हयातनगरमध्ये दमदार पाऊस झाला. रात्रीतून विभागात १७.६ मि.मी. पाऊस तर ऑगस्ट महिन्यात ८५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक ६७९.५ मि.मी.च्या तुलनेत विभागात आजवर ४९९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आजवर ३३ जणांचा मृत्यू■ १ जून ते २० ऑगस्टदरम्यान पुरात वाहून व वीज पडून विभागात ३३ जणांचा मृत्यू झाला, तर १६ जण जखमी झाले आहेत.■ यामध्ये सर्वाधिक ८ जण लातूर जिल्ह्यातील आहेत, तर लहान, मोठी ४८४ जनावरे दगावली.■ ६ घरांची पूर्ण पडझड तर पक्क्या १४९ घरांची अंशतः पडझड झाली. कच्च्या असलेल्या ३६० घरांची अंशतः पडझड झाली आहे.■ लातूर जिल्ह्यातील ९२२ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती महसूलविभागाने दिली आहे.
जिल्हा पाऊस (टक्क्यांमध्ये)छत्रपती संभाजीनगर ७६जालना ८१बीड ८५लातूर ७६धाराशिव ७९नांदेड ६७परभणी ६४हिंगोली ६६एकूण ७३.५