Join us

Marathwada Rain Update: मराठवाड्यात पुढील पाच दिवसात कसे राहणार हवामान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 18, 2024 3:49 PM

आज हिंगोली, नांदेड जिल्ह्यात मुसळधार, या तारखेपर्यंत मराठवाड्यात वादळी पाऊस

राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी लागत असताना पुढील पाच दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. आज हिंगोली व नांदेड जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी प्रती तास वाहणार आहेत.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, दिनांक 23 व 24 जून रोजी काही ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाडयात दिनांक 21 ते 27 जून दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित कमी राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग किंचित वाढलेला आहे.

टॅग्स :पाऊसमराठवाडाहवामानमोसमी पाऊस