Join us

Marathwada Rain update: नांदेड, लातूरसह मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 02, 2024 2:58 PM

मराठवाड्यात ६ जूनपर्यंत या जिल्ह्यांना पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून उकाड्याने घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून आज दि २ जून रोजी नांदेड, लातूर,परभणी, बीड, जालना व धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, ३ ते ६ जून दरम्यान बीड, नांदेड,लातूर व धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास राहणार असून वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

तापमान चढेच!

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज देण्यात आला असला तरी तापमान चढेच असल्याचे नोंदवण्यात आले. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्रानेही मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा चाळीस अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली.

टॅग्स :पाऊसहवामानतापमानमराठवाडा